Home महाराष्ट्र शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला लगावला होता. याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्पण केली श्रद्धांजली

“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…;” चंद्रकांत पाटलांचा टोला