Home महाराष्ट्र चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार

कराड : शरद पवारांना उद्या मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीच, तर ते सुप्रिया सुळेंना संधी देतील. पण आता उपमुख्यमंत्री करायची वेळ आली. तेव्हा शरद पवार यांनी अजित पवारांना केलं.. की, जयंत पाटील, हसन मुश्रीफ यांना केलं? अजित पवारांनी तर बंडखोरी केली होती, घर सोडलं, पक्ष सोडला होता, तेंव्हा पवारांनी कोणाची निवड केली? कारण ही शरद पवारांची पार्टी आहे, त्यांना हवं त्याला ते मुख्यमंत्री करणार, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली? आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, ते 105 असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळंच त्यांचं सारखं काही ना काही काड्या पेटवायचं काम सुरू आहे, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्पण केली श्रद्धांजली

“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…;” चंद्रकांत पाटलांचा टोला

आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू- संजय राऊत

अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली