Home देश अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली

अहमद पटेल यांनीआयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली

नवी दिल्ली :  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल   यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही महिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“अहमद पटेल यांच्या निधनाने मी दु:खी झालोय. अहमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रेस नेहमी स्मरणात ठेवेल, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दरम्यान, त्यांचा मुलगा फैजलशी बोलून भावना व्यक्त केला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, असं मोदींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

“भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली”

सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच…; शरद पवारांचा भाजपवर घणाघात

“आणखी एका भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”