रावसाहेब दानवेंनी रूग्णालयात बसून पैसे वाटले, म्हणून माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गाैफ्यस्फोट

0
746

औरंगाबाद : भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून रावसाहेब दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा टोलाही चंद्रकांत खैरेंनी यावेळी लगावला.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असंही चंद्रकांत खैरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संभाजीराजेंना बोलू द्या; संजय राऊत राज्यसभेत भडकले

“रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या बँकेला ईडीची नोटीस”

मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा निर्णय

‘अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ, भाजपचा ‘हा’ मोठा नेता अडचणीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here