“राणेंची मोठी खेळी; कोकणातील पदाधिकाऱ्यांसह, अनेक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश”

0
326

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे.

देवगड तालुक्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह दोन सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी व सरपंचांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती

दरम्यान, देवगडपाठोपाठ वैभववाडी तालुक्यातही भाजपने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सोसायटी संचालक विलास पोवार, दुध डेअरी चेअरमन दशरथ पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. नितेश राणेंच्याच उपस्थितीत या शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…

अखेर 24 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला गांधी कुटूंबाबाहेरचा अध्यक्ष; मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here