Home नाशिक “ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”

“ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”

550

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिदमे यांना शहराची महानगरप्रमुखाची सूत्रे हाती देत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून माजी नगरसेवकांना कोंडीत पकडले जात आहे.

शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जवळीक असलेल्या माजी नगरसेवक श्याम साबळे यांची ठाकरे गटाने हकालपट्टी केली आहे. याबाबतचं वृत्त सामना अग्रलेखामध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं केला भाजपमध्ये प्रवेश”

शिवसेनेत झालेल्या मोठा बंडाळीनंतर साबळे यांनी पक्षाच्या बैठका तसेच आंदोलनात सहभागी न होता स्वतःला अलिप्त ठेवले होते. मागच्या महापालिका निवडणुकीत साबळे यांना शिवसेनेकडून उमेदवारीदेण्यात आली होती. त्यांच्या विजयात आताचे पालकमंत्री दादा भुसे यांचा मोठा वाटा असल्याने भुसे म्हणतील त्याप्रमाणे ते वागत होते. मात्र अचानक शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे साबळे हेदेखील भुसे यांच्यामागे जातील असे तर्क लावले जात होते. त्या दृष्टीने त्यांनी भुसे यांच्याशी जवळीकही वाढवण्यास सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) पक्षाने त्यांची अधिकृतपणे हकालपट्टी केली आहे., अशी घोषणा सामना अग्रलेखात केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…

अखेर 24 वर्षानंतर काँग्रेसला मिळाला गांधी कुटूंबाबाहेरचा अध्यक्ष; मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…