Home महाराष्ट्र रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आण आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले कोरोनामुक्त झाले असून नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रामदास आठवले यांना गेल्या 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. अखेर त्यांची ही चाचणी कोरोना निगेटिव्ह आली आहे.

रामदास आठवले यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामदास आठवले उपचार घेत असलेल्या रुग्णालयापासून ते घरापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कोरोनामुक्तीसह दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मी पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे, असं  रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

महाराष्टातील धामिक स्थळे दिवाळीनंतर सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला