Home महाराष्ट्र माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव...

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. तसेच दिवाळीनंतरचे पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

कारशेडसह आरेतील जागेच्या व्यावसायिक वापराचा डाव होता; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं- सचिन सावंत

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते, पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही- जयंत पाटील

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा