Home महाराष्ट्र नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही. असं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन  उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांनी नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय.

कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं म्हणत आम्हाला आव्हान देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एकदा पराभव ठीक आहे, दोनदा-तीनदा पराभव होतो. कोकणवासियांनी ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल बोलून त्यांना मला मोठं करायचं नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

आम्ही सर्व तीन-चारदा निवडून आलेलो शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही पराभव कधीच पाहिला नाही. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायचं हे भाजपचं आव्हान आमच्यासाठी फार छोटं आणि कमकुवत आव्हान आहे”, असं म्हणत उदय सामंत यांनी राणेंना ललकारलं.

महत्वाच्या घडामोडी-

कारशेडसह आरेतील जागेच्या व्यावसायिक वापराचा डाव होता; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं- सचिन सावंत

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक होते, पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही- जयंत पाटील

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल- संजय राऊत