आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरीमधील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. अनेक तास त्यांच्या घरात धाडसत्र सुरू असून साळवी यांच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. यानंतर राजन साळवी यांच्याकडे साडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगून एसीबीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या सर्व घडामोडींवर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते माध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांऐवजी मोदींचं वय विचारावं, नाना पटोलेंच्या आव्हानाला, अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
आतापर्यंत माझ्या चार ठिकाणच्या प्रॉपर्टीचं मोजमाप झालेलं आहे. आता माझ्या मूळ घरात अधिकाऱ्यांची टीम आहे. त्यांच्याकडून झाडाझडती सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होईल, असं वाटतं. पण मला ठोस माहिती नाही. पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी, माझी पत्नी आणि माझ्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे”, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आमच्यावर ज्या-ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळी ते कुटुंबप्रमुख म्हणून पाठिशी उभे असतात. त्यांनी आज सकाळपासून दोनवेळा मोबाईलवर फोन करुन विचारपूस केली आहे. त्यांनी मला ठामपणे सांगितलं आहे की, राजन घाबरायचं कारण नाही. आम्ही तुझ्यापाठिशी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब म्हणून खंबीरपणे उभे आहोत”, असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ब्रेकींज न्यूज ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू”
मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; ठाकरे गटातील या नेत्याला अटक