Home महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…

राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मनसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सादर केली ‘ही’ 3 नावं आणि 3 चिन्हं, म्हणाले…

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन. , असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानं राज ठाकरे दु:खी, पण…; मनसेची प्रतिक्रिया

येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश