आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केला आहे. काहीही झालं तरी नाव सांभाळायचं असतं, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत म्हणत आहेत. हाच व्हिडिओ राज ठाकरेंनी ट्विट केला आहे.
हे ही वाचा : “ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली?; एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण आणि चिन्ह मिळालं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय”
नाव आणि पैसा.. पैसा येतो पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारातही मिळायचं नाही. त्यामुळे नावाला जपा, नाव मोठं करा” हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात ऐकू येतं. त्यानंतर या ट्विटच्या वर राज ठाकरेंनी लिहिलं आहे की, बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….तसेच राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy असं लिहिलं आहे.
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
देवेंद्र फडणवीसांच्या गाैफ्यस्फोटावर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…