Home पुणे राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  पुण्यात मनसेनं राष्ट्रवादीला धक्का दिला असून  राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खडकवासला, भोर, मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश झाला. तसेच यावेळी काही नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. स्वत: राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने पुण्यातील मनसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यात छावा ग्रुपचे पै. संतोष आप्पा आखाडे यांची खडकवासला विधानसभा प्रमुख म्हणून तर आप्पा दसवडकर यांची मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचा : “राणेंची मोठी खेळी; कोकणातील पदाधिकाऱ्यांसह, अनेक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश”

आजचा पक्षप्रवेश प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी होता, अशी माहिती मनसे नेते वसंत मोरे यांनी दिली. यावेळी इतर छोटेमोठे कार्यकर्ते मनसेत दाखल झालेत. त्यामुळे मनसेची ही नवी जुळवाजुळव पुणे मनसेला खरंच नवसंजीवनी देणारी ठरवणार का? आणि संभाव्य गळती थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती

“ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, मराठी एकजूट…