आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांवर हक्क सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच तापल्याचं बघायला मिळत आहे. अशातच काल कर्नाटकमधील हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळं सीमावाद आणखीच चिघळला आहे. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. , असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांची नजर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्यावर; बाळासाहेब थोरातांसमोरच फडणवीसांनी सांगितलं थेट नाव
सीमावाद उफाळून यावा यासाठी कोणाकडून तरी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्नाटकातून कोण खतपाणी घालत आहे हे उघड असले तरी, महाराष्ट्रातून त्याला कोण खतपाणी घालत याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, असं मत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
बेळगाव भागातील मराठी बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कर्नाटक सरकारने थांबवावेत, महाराष्ट्रातील वाहनांची होणारी तोडफोड थांबवावी. त्यातून हे प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी तोंडावर आवर घालावा , असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.
महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद कर्नाटकमधील 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हा मुद्दा उखरून काढला जातो आहे. मात्र त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सुटायला हवा, असंही मत राज ठाकरेंनी यावेळी केली.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. #अखंडमहाराष्ट्र pic.twitter.com/2Rq1XCGGHz
— Raj Thackeray (@RajThackeray) December 7, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं
मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं विधान, म्हणाले…