आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र, तर काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष युतीने सर्व जागांवर लढले होते. या निवडणूकित शिवसेनेचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी- काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड तसेच काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी जी. प.अध्यक्ष रंगनाथ काळे यांनी सोयगाव निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
हे ही वाचा : बीडमध्ये धनंजय मुंडे यांना धक्का; बीड नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीसाठी अनेक पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या. परंतु शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.
दरम्यान, सत्ता असलेल्या भाजपला दूर सारत शिवसेनेला 17 पैकी 11 जागेवर स्पष्ट बहुमत दिले आहे.तसेच भाजपला विरोधी बाकावर बसवीत काँग्रेस -राष्ट्रवादी उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकावर ठेवल्याने या निवडणुकीत भाजपला जोरदार चपराक दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा नारायण राणेंना मोठा धक्का; राणेंच्या हातून गेली सत्ता
भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती; शिवसेनेच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी
“सोलापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, मनसेच्या रेश्मा सुरेश टेळे नगरसेवकपदी विराजमान”