आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये काल आंंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट तयार झाली आहे. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या त्या कुटूंबाचं सांत्वन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावरून काँग्रेससह अन्य पक्षांनी योगी सरकारवर टीका केली. यावर आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे.
प्रियांका गांधी यांनी दिलेल्या लढ्याला यश आलं आणि यानिमित्ताने त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारलं. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केलं, असं सामनात म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी
सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका
शिवसेनेत जोरदार इनकमिंग, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश”