Home नाशिक पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी

पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं लक्ष हे पुणे आणि नाशिक महापालिकेकडे लागलं असून आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि मनसेची युती व्हावी अशी मागणी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशीच मागणी होत आहे.

नाशिकचे मनसेतील पदाधिकारी भाजपसोबत युती करण्यास तयार असून, राज ठाकरे यांनी होकार दिल्यास, महाविकास आघाडीतील पक्षांची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, मनसे भाजपशी युती करण्यास उत्सुक असली तरी भाजपने यावर सध्या मौन बाळगणे पसंत केलं आहे. महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. तर मनसेचे केवळ पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी मनसे मोठी मेहनत घेत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”

जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका

शिवसेनेत जोरदार इनकमिंग, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश”