नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात अलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणाऱ्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
गेल्या सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुर झाले होते. लोकसभेत या विधेयकाला 311 विरुद्ध 80 अश्या फरकाणे मंजुर करण्यात आले होते.
यानंतर केंद्र सरकारकडूनही हे विधायक राज्यसभेत सादर करण्यात आले. राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संमती मिळाली. राज्यसभेत राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला 125 विरुद्ध 105 अशी मते पडली.
दरम्यान, त्रिपूरा आणि आसाममधून नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे
बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा
“ताईसाहेब काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक नक्की बांधेल”
“माझ्या डोळ्यातले अश्रू मी सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाहिले”