Home महाराष्ट्र मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस...

मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र एका नेटकऱ्यानं अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देत अमृता फडणवीसांना ट्रोल केलं आहे.

मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आलं नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील, असं अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विटला अनुज अर्चना एकनाथ गायकवाड या नेटकऱ्याने उत्तर दिलं आहे. आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन 73 वर्ष झाली आणि ह्यांनी 100 वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत.. ह्यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाट.. न्हवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते., असं ट्विट करत अनुज अर्चना एकनाथ गायकवाड या नेटकऱ्याने अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.


महत्वाच्या घडामोडी-

“डाॅ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात नेहमी पाठीशी ठाम उभे राहिले”

“मोठी बातमी! वीज दरवाढीविरोधात भाजप ‘या’ दिवशी करणार महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन”