“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी”

0
262

रत्नागिरी : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हिच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य  सरकारला टोला लगावला आहे.

महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण…; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांनां टोला

“संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य”

“महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड, यांनी राज्याला बिघडवू नये”

“बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here