…अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता शिवसेनेला माफ करणार नाही- अतुल भातखळकर

0
315

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावर घडलेल्या या प्रकारानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी झालेल्या प्रकारचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

माझ्या मतदारसंघात राहणारे निवृत्त नाैदल अधिकारी श्री. मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांवरचं एक कार्टून फक्त व्हाॅट्सअपवरून फाॅरवर्ड केले म्हणून 2 शाखाप्रमुखांसह 7- 8 शिवसैनिकांसह आज त्यांना घरात घुसून मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या कृत्याचा मी कडक निषेध करतो. मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून आता निवृत्त सैनिकांवर सुद्धा हल्ला करण्याचं घृणास्पद कृत्य शिवसैनिक करत्यात मी याची कडक निंदा करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं सांगू इच्छितो, अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता व मुंबईची जनता आपला आवाज कधीच गप्प करणार नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा आणि…- देवेंद्र फडणवीस

BSNL चा युजर्ससाठी 49 रुपयांचा जबरदस्त प्लॅन, 2 GB डेटा अन् ….

“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here