आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : राष्ट्रवादीतील फूटीनंतर, शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना, एक मोठं विधान केलं.
अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, असं विधान शरद पवारांनी यावेळी केलं. पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. पवारांच्या या विधानानंतर ठाकरे गटाकडून, जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. आता या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे.
ही बातमी पण वाचा : “सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”
पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिले तर डोकं फुटायची वेळ येईल., असं बच्चू कडूंनी यावेळी म्हटलं. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिले तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडले तसे इथे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार म्हणाले, अजित पवार आमच्यासोबतच, राष्ट्रवादीत फूट नाही, आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…
गुवाहाटीला जाऊन काय मिळालं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ चेहरा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन