आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने आज दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजाताईंच्या पक्षामुळं समाजाचं हित नाही, असं वक्तव्य केलं. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या भाजप नाही. तर मी भाजप पक्षाची आहे. भाजप पक्ष खूप मोठा आहे.
ही बातमी पण वाचा : फडणवीसांच्या भेटीनंतर, राज ठाकरेंची मनसे, शिंदे गट-भाजप युतीसोबत?; चर्चांना उधाण
“आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. जानकर म्हणाले की ताईंच्या पक्षानं हे केलं. भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं”, असं पंकजा म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं माहेर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरात जाईन, असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पावसामुळे WTC FINAL 2023 रद्द झाल्यास, कोण वर्ल्ड चॅम्पियन असेल?; ICC नं स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र