Home महाराष्ट्र पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले असून यामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांना का डावलण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की,पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल.

हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी

पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही. परंतु, भाजपमधील नाराजी ही, पाण्यातील एखादं जहाज क्रेनने उचललं तर पाण्यात पडणारा जो खड्डा असतो, तसाच लगेच भरला जाणारा असतो. त्यामुळे नाराजी ही तात्कालिक असते, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा संघटना करते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं.

महत्वाच्या घडामोडी –

विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं

“महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत का केली विनंती?”

महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…