Home महाराष्ट्र महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपला आपापल्या आमदारांची फाटाफुट टाळण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आपल्या आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.

सुरुवातीला शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील विधानभवनानजीकच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, तिथे भाजप आमदारांचाही मुक्काम असल्याची माहिती कळताच शिवसेनेने हे हॉटेल बदलले. यावरून आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण तुमच्यावर…; दिपाली सय्यद यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

भाजपनं राज्यसभेसाठी जो तिसरा उमेदवार उभा केला आहे तो नक्की निवडून येईल याबाबत कुठलाही साशंकता नाही. त्यांनी कितीही मोर्चेबांधणी करू द्या. गेल्या तीन-चार दिवसात त्यांनी बोलावलेल्या बैठकीला अपक्ष आमदार उपस्थित नव्हते. अपक्षांच्या भरवसेवर ते सत्तेत आहेत तर त्याच आमदारांवर यांनी अविश्वास का दाखवावा. त्याचबरोबर आमच्याकडे सर्वाधिक मतं आहेत. अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, त्यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे अपक्षांच्या मतांची गॅरंटी नाही. त्यांना मतं कुठं द्यायचं हा अधिकार आहे. त्यांना कोंडून ठेवलं तरी भाजपलाच मतं मिळतील. भाजपचे उमेदवार निवडून येतील. बैठकीचा फायदा होणार नाही.,असं दानवे म्हणाले.

दरम्यान, आज हाॅटेल बदललं आहे. मांजर जसं पिल्लाला या घरातून त्या घरात नेत असतं तशी हालत करून ठेवली आहे, असा जोरदार टोला रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडीला लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

पुणे मनसेला पुन्हा हादरा; ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम

“…पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”

BMC निवडणुकीच्या तोंडावर डॅशिंग नितीन नांदगावकर यांच्यावर शिवसेनेने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी