आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता कोणाला मंत्रीमंडळात संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेेच मनसेला मंत्रीमंडळात स्थान मिळणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सूरू असतानाच यावरून आता रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा : गिरीश महाजन हे बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊन ते मत मागत होते; एकनाथ खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर
मनसेला मंत्रीमंडळात घेण्याचा काही संबंध नाही, असं आठवले म्हणाले. मनसे हा वेगळा पक्ष आहे. तो ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत ना आमच्यासोबत. ते निवडणूकीत आमच्या सोबत नव्हते. त्यांना मंत्रीपद दिलं तर आमचा विरोध आहे. मंत्रीपद देण्याचा काही विचार होत असेल तर आम्ही विरोध करू, असं आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त
40 गेले मात्र आता भगव्याच्या 100 शिलेदारांना निवडून आणू; शिवसेनेचा बंडखोरांना इशारा
“उद्धव ठाकरेंनी बोलावलं, तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य”