‘…नाही तर गुन्हा दाखल करू’; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा

0
472

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण: शिवसेना आणि भाजपमध्ये 472 कोटींच्या रस्ते निधीवरून चांगलीच जुंपली आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याला शिवसेनेतून उत्तर देण्यात आलं आहे.

भाजपने रस्ते निधीवरून केलेली टीका हस्यास्पद आहे. 472 कोटींच्या निधीबाबतचे पुरावे दाखवा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

हे ही वाचा : “3 महिन्यात 20 हजार बांधकाम कसे पाडणार?; निवडणूकीचा टार्गेट तर पूर्ण करायचं तर नाही ना”

शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम आणि राजेश मोरे यांनी पत्रकार आज परिषद घेऊन चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. रवींद्र चव्हाण हे तीन टर्म आमदार आहेत. ते मंत्री सुद्धा होते. त्यांनी त्यांच्या डोंबिवली मतदार संघात काय विकास कामे केली हे जाहीर करावं, असं दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

मंत्री असताना स्वत:च्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही आणि दुसऱ्या शहराच्या विकास कामासाठी दौरा आयोजित करणे हे हस्यास्पद आणि अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी ज्या 472 कोटी निधीच सतत रडगाणं लावलं आहे, त्या निधीची तरतूदच एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात नाही. मग ते कोणत्या निधी बाबत बोलत आहेत? असा सवालही म्हात्रेंनी केला.

दरम्यान,  एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात या रस्ते निधीची तरतूद असेल तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. अन्यथा नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू. तसेच निवडणूक आयोगाला तक्रार करू, असं या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील हे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

मनसेचा मोठा निर्णय; रूपाली पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर महिला संघटना नियुक्तीस प्राधान्य”

हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here