मुंबई : लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.
ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असं संदीप देशपांडे यांनी राज्य म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं.
ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्यावी.राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…
पंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”
“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रूपये पाठवले तरी, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?”