मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे. तसेच त्यांनी राज्यसरकारच्या खात्यातून काही क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सवलती दिल्या आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकारने जाहिर केलेलं पॅकेज हे निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे, असं म्हणत टीका केली होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज राजकारणापलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणं हे सर्वांचं कर्तव्य असलं पाहिजे. अनेक परिवारातील कर्ते लोकं मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू आम्ही पाहिले आहेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. त्या अश्रूंवर राजकारण करू नका, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन नाहीये, हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. तसंच त्याचं जर खरंच वजन असेल तर, त्यांनी महाराष्ट्राच्या वाटेचे केंद्रात अडकलेले 90 हजार कोटी रूपये मिळवून द्यावे, असं आव्हान यावेळी नाना पटोलेंनी फडणवीसांना दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं; शंभुराज देसाईंचा गोपीचंद पडळकरांवर टीका
“CBSE Board Exam! दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे”
आता ‘या’ शहरात रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! पहा व्हिडिओ