आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संबंधित एक आक्षेपार्ह व्हिडीओ टीव्हीवरून प्रसारीत केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आज विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले. यावरून किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झाला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांच्या व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे,” असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण जोरदार चर्चेत असताना किरीट सोमय्या यांचं आता नवं ट्वीट चर्चेत आलं आहे. सोमय्या यांनी मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ट्वीट केलं आहे.
आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचं कंत्राट ‘ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी’ला देण्यासंबंधीत फाईलची RTI अंतर्गत तपासणी केली. तसेच MMRCL मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली., असं सोमय्या म्हणाले. तसेच” या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.
मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळा,
आज जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सी ना देण्या संबंधी चा फाईल चे RTI अंतर्गत इन्स्पेक्शन केले, MMRCL मुंबई मेट्रो चा अधिकाऱ्यांशी चर्चा केली @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
विरोधी पक्षातून, सरकारमध्ये आल्यावर कोणता फरक जाणवतो; अजित पवारांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…