आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं म्हटल्यानंतर हे सगळेजण टुणकन भाजपबरोबर गेले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “पक्षफुटीवर, जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, अजित पवार आमच्याच पक्षात, मात्र…”
कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी (राज ठाकरे) ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेबरोबर आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध आगपाखड करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोहिनूरच्या माध्यमातून ईडीची नोटीस येते. मग ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका बदलतात. त्याचा परिणाम म्हणून ते महाराष्ट्राच्या पटलावर कुठेही दिसत नाहीत., असंही मिटकरी म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘ईडी’च्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपमध्ये गेले; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
युतीसाठी भाजपकडून ऑफर, मात्र…; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा गौफ्यस्फोट
…तर आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य