“राष्ट्रवादीतल्या बंडावर, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले, …तोपर्यंत व्हीपचा निर्णय…”

0
333

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षांसाठी मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान?”

कारण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, एवढच नाही तर अजित पवार गटाकडून आपणच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला जात आहे. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगातही दाद मागितली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसाठी, पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? हे ठरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. यावरून आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आह.

‘व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे. मूळ पक्ष कुणाचा याची खात्री होत नाही, तोपर्यंत व्हीपचा निर्णय घेणं अवघड आहे, त्यामुळे आधी मूळ राजकीय पक्ष कोणता हे बघावं लागेल. पावसाळी अधिवेशनातल्या आसन व्यवस्थेवर योग्य निर्णय घेऊ, असं राहुल नार्वेकर म्हणाले. तसेच ‘जयंत पाटील यांची याचिका दाखल झाली आहे, या याचिकेची स्फुटणी सध्या सुरू आहे, त्याची खात्री पटल्यानंतर पुढची कारवाई करू,’ असंही नार्वेकरांनी यावेळा सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! पुण्यात पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार ‘या’ दिवशी एकाच मंचावर एकत्र येणार?;”

सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका

“न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, मै तो…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here