नवी दिल्ली : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. त्यानंतर देशभर चीन विरोधी वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर चीनकडे आपल्याला वाचवणारा देश किंवा भारताला धडा शिकवणारा देश म्हणून पाहणाऱ्या काश्मिरींना माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कानउघाडणी केली.
चीनमध्ये उइगर मुस्लिमांचे कसे हाल होतात, याची आठवण अब्दुल्ला यांनी करून दिली आहे. ज्यांना चीन जवळचा वाटतो त्यांनी थोडं Google वर Uighur Muslims असं सर्च करून पाहावं आणि मग ठरवावं तुम्ही कशाला निमंत्रण देत आहात’, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत काश्मिरींना चांगलंच सुनावले.
Those Kashmiris tempted to look towards China as some sort of saviour need only google the plight of Uighur Muslims. Be careful what you wish for……….
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 17, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”
“अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”
काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित
“काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री भेटीची वेळ मिळाली”