मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातील लिखाणाबद्दल आक्षेप घेत संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं.
अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील, असं म्हणत संजय राऊतांनी म्हटलं आहे.
सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये; शिवसेनेचा टोला
“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”
कोरेगाव-भीमाच्या इतिहासाबाबात रामदास आठवलेंची ‘ही’ मोठी मागणी
मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? मातोश्रीबाहेर मनसेचा बॅनर