Home देश “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 86 वर्षाचे होते.

बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज त्यांचं निधन झालं. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते.

दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहतानाच दलितांचे नेते म्हणूनही त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली होती. 1978 ते 1980 या काळात ते काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले.

महत्वाच्या घडामोडी-

अरे बापरे…मला भीती वाटतेय त्यांची; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये; शिवसेनेचा टोला

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

कोरेगाव-भीमाच्या इतिहासाबाबात रामदास आठवलेंची ‘ही’ मोठी मागणी