आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज झालेत आणि त्यांनी सोशल मीडियावर पक्षाची बदनामी सुरू केली, त्यांना मनसेमधून हाकलण्यात आलं आहे.
हे ही वाचा : “भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”
शाखाप्रमुख रमेश पुरी, सहसचिव मध्य विभाग चेतन शर्मा, सहसचिव मध्य विभाग संदीप कुलकर्णी आणि दीपक पवार यांना मनसेने पक्षातून बाहेर काढले आहे.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनाम गुलाटी, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, वैभव मिटकर, महानगरप्रमुख बिपीन नाईक, शहराध्यक्ष गजन गौडापाटील, आशिष सुरडकर यांच्या स्वाक्षरीने उल्लेखित चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
मी आबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे, त्यामुळे…; रोहित पाटलांनी दिला वडिलांच्याआठवणींना उजाळा
MHADA पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा; या भाजप नेत्याला अटक