आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
वसई : पालघर जिल्ह्यातील वसईत मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दल आपक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या मनसे सैनिकांनी ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा सचिवाच्या कार्यालयात जावून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही रविवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कार्यालयात जबरदस्ती घुसने, तोडफोड करणे, महिलेचा विनयभंग आणि धक्काबुक्की करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.
हे ही वाचा : “ज्यांनी भगव्याला कलंक लावले, त्यांचे हात…; जळगावातून उद्धव ठाकरेंचा घणाघात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सचीव प्रमुख अनिल चव्हाण यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचाच जाब विचारण्यासाठी मनसेचे वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर हे आपल्या 10 ते 15 पदाधिकाऱ्यांसह अनिल चव्हाण यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले. यावेळी त्यांनी शाब्दिक बाचाबाची करून, कार्यालयाची तोडफोड केली. तसेच महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या घडामोडी –
हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय
अजितदादांच्या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय”