आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

0
150

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम नि:स्वार्थपणे करत आहे. तो स्वत: या मजुरांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी बसेसची सुविधा करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे. त्याच्या या कामाचं सर्वच स्तरांतून खूप कौतुक होत आहे. यावर एका नेटकऱ्याने सोनू सूदला टॅग करत त्याचे कौतुक केले.

परप्रांतीय जेव्हा मुंबईत फिरण्यासाठी, मुंबई बघण्यासाठी येतात तेव्हा आवर्जून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांची घरं पाहतात. मात्र आता हे चाहते मुंबईत सोनू सूदचं घर कुठे आहे, हे शोधणार असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं. यावर सोनू सूदने या ट्विटवर दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

दरम्यान, या ट्विटला उत्तर देत सोनू सूद म्हणाला, मित्रा, ते काय माझ्या घरी येतील, मीच त्या सर्वांच्या घरी जाणार आहे. माझ्या भावांवर खूप साऱ्या पराठ्यांची, पान आणि चहाची उधारी बाकी आहे.  सोनू सूदच्या या उत्तरामुळे चाहत्यांमध्ये सेलिब्रिटीची एक नवी प्रतिमा तयार झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; गुलाबराव पाटलांच भाजपला आव्हान

…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला पडलाय- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here