“बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आता मला पुढे घेऊन जायचा आहे”

0
337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नाशिक दौऱ्यानंतर मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिऱ्यांशी संवाद साधला. मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागली.

हे ही वाचा : जिथं सत्ता नव्हती, तिथं आणली गेली; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे आणि त्यांचे जवळचे लोक म्हणत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. मात्र त्यांना सांगतो, वारसा हा वास्तूंचा नसतो तर विचारांचा असतो. आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आता मला पुढे घेऊन जायचा आहे, असं राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका तुम्ही ताकदीने लढवा. आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असा विश्वास ही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला .

महत्त्वाच्या  घडामोडी –

तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात झाले दाखल

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here