मुंबई : ‘आशा’ स्वयंसेविकांनी तुटपुंज्या मानधनासह इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मनसे नेते श्री अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ‘आशा’च्या शिष्टमंडळाने अमित ठाकरेंच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. तसंच आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतं, अशी भावनाही व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 72 हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे 3 हजार 500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या ‘आशां’नी कोरोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (1600 ते 2500 रुपये) मानधन दिले जातं.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत ‘आशां’नी करोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना दिले जाणारे तुटपुंजे मानधन तसंच आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी आज मनसे नेते श्री. अमित ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. #आरोग्यस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/Rzt2XQKWKB
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पंतप्रधान तर लांबच… पुढच्यावेळी शिवसेनेचा मुंबईत महापौर तरी बसवा- नितेश राणे
चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा
जर जमीन चीनचीच होती तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल
… मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?; जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल