Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

मुंबई : करोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. या पत्रातून राज्यातील एकूण स्थिती फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई व महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. 19 जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक 3,827 रुग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या 114 इतकी नोंदवली गेली. 18 जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येत 52.18 टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा 73.85 टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा 5.27 टक्क्यांवर पोहोचला आहे, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच; विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

पंतप्रधान तर लांबच… पुढच्यावेळी शिवसेनेचा मुंबईत महापौर तरी बसवा- नितेश राणे

चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल; PMO चा इशारा

जर जमीन चीनचीच होती तर…; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल