नागपूर : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल सायंकाळी पार पडला. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी यावेळी केला.
दरम्यान, इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढली. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
मुंडे भगिनी नाराज नाहीत, अकारण बदनामी करू नका- देवेंद्र फडणवीस
“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं”
रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही; चाकणकरांच्या बंटी-बबलीच्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर
“नारायण राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”