Home महाराष्ट्र “शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं”

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं”

मुंबई : मोदींच्या मंत्रीमंडळाचा नव्याने विस्तार झाला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात भाजप नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या.

नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्याकडून राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत हे प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राणे साहेबांना मिळालेलं खातं छोटं आहे की मोठं हे येणाऱ्या काळात ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे. त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार, असं म्हणत दरेकरांनी राऊतांवर टीका केली.

राऊत यांना राणे साहेबांना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा हल्लाबोल दरेकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही; चाकणकरांच्या बंटी-बबलीच्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर

“नारायण राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

“सत्य हेच आहे की, हे सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शाह”

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”