Home महाराष्ट्र “नारायण राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

“नारायण राणेंना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी, तरीही आमच्या शुभेच्छा”

मुंबई : मोदींच्या मंत्रीमंडळाचा नव्याने विस्तार झाला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात भाजप नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्याकडून राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. तसंच मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्य हेच आहे की, हे सरकार फक्त दीड माणसं चालवताहेत, एक मोदी आणि अर्धे अमित शाह”

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो; भास्कर जाधवांचा नितेश राणेंना टोला