Home पुणे स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील

स्थगिती उठविली न जाणं ही सरकारची एक प्रकारे नाचक्की- चंद्रकांत पाटील

पुणे : मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज तरी सरकार पूर्ण तयारीनं जाईल आणि स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा होती. पण कुठलीही पूर्वतयारी नसल्यानं कुठलेही मंत्री दिल्लीत पोहोचले नाहीत. अतिशय ताकदीनं जी केस लढवायला हवी होती, ती लढवलेली नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, कोर्टानं मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला त्याचा मी निषेध करतो. आज न्यायालयात तेच तेच मुद्दे पुन्हा मांडल्यामुळे न्यायमूर्तींनी विचारलं तुमचे नवीन काय मुद्दे आहेत. सरकारकडून नवीन कोणताच मुद्दा मांडला नसल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. ती सरकारची एक प्रकारे नाचक्की आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”

“मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”

“सांगलीत एका महिलेकडून अल्पवयीन तरूणावर बलात्कार”

“पुण्यातील कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश”