Home देश “मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”

“मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

आपल्याकडे आणखी काही दिवस आहेत आजचा पहिलाच दिवस होता, यामध्ये युक्तीवाद करु, त्यानंतर निर्णय घेऊ, मात्र तुर्तास स्थगिती,असं सर्वाच्च न्यायालयाने सांगितलं.

पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल, असं घटनापीठाने सांगितलं.

दरम्यान, सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणं देऊन अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नाही, असं सर्वाच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी-

“सांगलीत एका महिलेकडून अल्पवयीन तरूणावर बलात्कार”

“पुण्यातील कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश”

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबतच”

“भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”