Home देश “आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”

“आता देशात प्रत्येक ठिकाणी फ्री WI-FI; ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे देशात वाय-फाय क्रांतीच होणार असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत देशात पब्लिक डेटा ऑफिस उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी लायसन्सची गरज पडणार नाही. कोणत्याही दुकानाचं डाटा ऑफिसमध्ये रुपांतर करता येऊ शकतं. सरकारकडून डाटा ऑफिस, डाटा अॅग्रिगेटर आणि अॅप सिस्टिम उघडण्यासाठी 7 दिवसात सेंटर उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे., असं सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार”

“सांगलीत एका महिलेकडून अल्पवयीन तरूणावर बलात्कार”

“पुण्यातील कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश”

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबतच”