मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, घाबरु नका, काळजी घ्या; महापौर किशोरी पेडणेकर यांचं जनतेला आवाहन

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. रोज २० हजारावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र यातील बहुसंख्य रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने मुंबई डेंजर झोनच्या बाहेर आहे. त्यामुळे लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावण्याची गरज नाही,  मुंबईकर नागरिकांनी घाबरू नये मात्र स्वताची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “आशिष शेलार यांच्यानंतर आता काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी”

ग्राऊंड रिॲलिटी काय आहे? हे बघण्यासाठी आले होते. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. बीकेसीत 2 हजार 500 बेडस आहेत. त्यात 1 हजार 300 बेड्स विना ऑक्सिजन, 890 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. बीकेसी आयसीयूत एकही पेशंट्स नाही. मुंबईत २० हजार रुग्ण आढळून आले तरी त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. २० हजार रुग्ण आढळून आले यात लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहेत. यामुळे बेड रिक्त असल्याने सध्या तरी मुंबई डेंजर झोनमध्ये नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईतील रोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या 20 हजारावर तर सक्रिय रुग्णांची संख्या 90  हजारावर गेली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी वांद्रे बिकेसी येथील कोविड सेंटरची पाहणी करून बेडसचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी – 

किरीट सोमय्यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी, राज्य सरकारची नवी नियमावली, वाचा काय सुरू, काय बंद”

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजपच्या ‘या’ आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here