आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर शिवसेनेचं धनुष्यबाण शिंदे सरकारकडे जाणार, अशा चर्चा रंगू लागल्या. यावरून आता शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपला शिवसेना संपवायची असल्याने ते कोंबडय़ांची झुंज लावावी तसे शिवसेना आणि त्यातून फुटणाऱ्यांची झुंज लावत आहेत. झुंजीत एक कोंबडा मेला की दुसऱ्याला मारून टाकतील. तसेच कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे-भाजप सरकारला दिला. उद्धव ठाकरेंनी काल शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते.
हे ही वाचा : “भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”
कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे पदाधिकारी तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक”
“जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?”
“राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”