Home देश “भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”

“भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भाजपसोबत युती करण्यासाठी बोलणी झाली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार आणि गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे.

भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाली होती, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक”

उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी युतीसाठी प्रयत्न झाले पण भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याने ती गोष्ट तेव्हा घडू शकली नाही. या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. माझ्या परिने मी युतीचे सर्व प्रयत्न केले. आता तुम्ही देखील प्रयत्न करा. त्यानंतर मी चार-पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, असंही राहुल शेवाळे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांसह दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल शेवाळे बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?”

“राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

‘रामदास कदम ढसाढसा रडले’; म्हणाले, उद्धवजी तुम्ही…